2018

मराठी भाषा दिन

दिनांक:०५/०३/२०१८

फाल्गुन शु.१२,पुष्य नक्षत्र अर्थात दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी व कविवर्य वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मानिमित्त मराठी भाषा दिवसमोठ्या उत्साहाने व हर्ष उल्हासाने बी.आर.हरणे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर काराव , वांगणी येथे साजरा करण्यात आला.

     सदर कार्यक्रमासाठी स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सुज्ञा माहिमकर व आयुर्वेदाचार्य डॉ.राहुल पालशेतकर ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्थापत्य शाखेचे सर्व स्नातक व अधिस्नातक ,शिक्षकेतर कर्मचारी , प्रथम वर्षीय ,द्वितीय वर्षीय, तृतीय वर्षाचे सर्व विद्यार्थी जातीने हजर होते.

     उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजवलित होऊन व सहाय्यक प्राध्यापक श्री.विवेक विलेकर ह्यांच्या प्रस्तावावरून कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच कु.केविन नरोन्हा ह्याने कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

     स्थापत्य शास्त्राच्या प्राचार्य डॉ.सौ.सुज्ञा माहिमकर ह्यांचे गजाननाला वंदन करून बासरी वादन झाले व त्यांना तबल्यावर प्रथम वर्षीय विद्यार्थी कु.स्वरूप जोशी ह्यांनी उत्तम साथ दिली.कु. खुशबु दाभाडे व कु.सरनाली करमाकर (दोघेही प्रथम वर्षीय विद्यार्थी) ह्यांनी एक सुंदर गाणे गाईले तसेच कु. भाग्यश्री पवार हिने सादर केलेली एकांकिका खरच वाख्ण्य जोग होती.

     कु.तुषार कांबळे (द्वितीय वर्ष विद्यार्थी ) व स्थापत्य शास्त्र शाखेचे स्नातक श्री.प्रशांता पोद्दार ह्यांनी मराठी भाषा दिन म्हणजे काय ह्याचे मर्म सर्वाना समजावून सांगितले व तो का साजरा करावा हे ही समजावून सांगितले.कु.समृद्धी देसाई व कु.अश्विनी गरुड ह्या जोडीने सादर केलेली लावणी नृत्य मंत्रमुग्ध करणारी ठरली तसेच कु.श्रेयस मेस्त्री ,कु.प्रथमेश आचरेकर ह्यांनी नवीनच आणलेला तालवाद्य वादन केले व उपस्थित श्रोत्यांनी दाद मिळवली.

     स्थापत्य शास्त्र शाखेचे सहाय्यक प्राधाय्पक श्री.विवेक विलेकर ह्यांनी जीवन गाणे सुंदर गाणे गाईले व श्रोत्यांची वाहवा मिळवली, कु.यश खडकबाण ,प्रणव जोशी, हर्षद पाटील, देवेंद्र मिरकुटे व इतरांनी शिवरायांचे पोवाडा गाईला व अंगावर जोशांचा व अभिमानाचा काटा उभा राहिला.

     तसेच सूर्य मंदिर स्पर्धा व समाज उपयोगी उपक्रम संवाद कर्ण बधीर प्रबोधिनी डोंबिवली ह्या शाळेत जाऊन कर्ण बधीर मुलांसाठी नकाशा वाचन व नकाशा रेखनह्या विषयांवर कार्यशाळा केले, त्यासाठी त्यांना प्राध्यापक श्री.जयराज घाटगे ,सौ.केतकी गुप्ते,श्री मोहम्मद हसीब,स्नेहा ताईशेटे ह्यांनी उत्तम संचालन मार्गदर्शन केले. ह्या साठी त्यांना (विद्यार्थी व शिक्षकांना) सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

     कु.यश खडकबाण व कु.निलाक्षी केसरकर ह्यांनी कार्यक्रमाची सूत्रे उत्तम सांभाळली. शेवटी रोहन वैती (तृतीय वर्ष) ह्यांनी स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ.सुज्ञा माहिमकर ह्यांच्या हस्ते गुलाब पुष्प डॉ.राहुल पालशेतकर ह्यांना देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

     सदर कार्यक्रम उत्तमरीत्या सादर होऊन सर्वाना आवडला.